तुम्ही हिंदू गोमूत्राने अंघोळ करता, तुम्ही भारताला नष्ट केले आणि अमेरिकाला करत आहात !

अमेरिकेमध्ये हिंदुद्वेेषी विधाने करणार्‍या एका व्यक्तीचा व्हिडिओ प्रसारित  

कॅलिफोर्निया (अमेरिका) – येथील फ्रीमोन्ट शहरामध्ये हिंदूंचा द्वेष करणारा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात एक विदेशी नागरिक भारतीय व्यक्तीला अश्‍लील शिवीगाळ करत असल्याचे दिसत आहे. ही घटना २१ जून २०२२ ची असल्याचे सांगितले जात आहे.

१. कृष्णन् जयारमन् येथील एका उपाहारगृहात बसलेले असतांना एक व्यक्ती येते आणि त्यांना शिवीगाळ करतेे. ती म्हणते ‘तुम्ही दुय्यम दर्जाचे लोक उघडे पाय घेऊन येथे का आलात ? हा भारत नाही. तुम्ही भारताला नष्ट केले आणि आता अमेरिकेला नष्ट करत आहात.

२. कृष्णन् यांनी सांगितले की, तो म्हणत होता, ‘तुम्ही हिंदू गोमूत्राने अंघोळ करता.’ त्याने माझ्या तोंडावर डॉलर फेकले आणि सगळीकडे थुंकू लागला. तो हिंदी आणि पंजाबी भाषेत बोलत होता. तो इंदिरा गांधी यांचे नाव घेऊन बाँब फेकण्याची भाषा करत होता. मला वाटले की, तो भारतीय असेल आणि त्याचा खलिस्तानवाद्यांशी संबंध असणार. या वेळी पोलिसांना बोलावण्यात आल्यावर तो शांत झाला.

संपादकीय भूमिका 

अमेरिका नेहमीच भारतामध्ये कथितरित्या अल्पसंख्यांकावर अत्याचार होत असल्याचा आरोप करते; मात्र तिच्याच देशात अनेक शतकांपासून वर्णद्वेषी घटना घडत आल्या आहेत त्याकडे डोळेझाक करते !