सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

वर्ष २०२० मधील दिवाळीच्या कालावधीत सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका रामनाथी आश्रमात आले होते. त्या वेळी मी त्यांना सहज म्हटले, ‘‘परात्पर गुरुदेव तुमची आठवण काढतात.’’ त्यावर ते पटकन म्हणाले, ‘‘गुरुदेव आमची आठवण काढून आमचे पालनपोषण करत आहेत. मी एका ग्रंथात वाचले होते, ‘कासवी स्वतःच्या दृष्टीने (डोळ्यांनी पाहून) तिच्या पिल्लांचे पोषण करते. तिच्या दृष्टीनेच तिच्या पिल्लांची वाढ होते. तसे माझे आहे. मी अध्यात्म प्रसाराच्या निमित्ताने दूर असलो, तरी परात्पर गुरुदेव माझी आठवण काढून मला चैतन्य देतात. त्यांच्यामुळेच मी आहे !’’ – कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.६.२०२२)