अमेरिकेत भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त काढलेल्या मिरवणुकीत बुलडोझर आणल्याने वाद

न्यू जर्सी (अमेरिका)  – अमेरिकेत भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या मिरवणुकीत बुलडोझरचा वापर करण्यात आल्याने वाद निर्माण झाला. मिरवणुकीत बुलडोझर आणणार्‍या ‘इंडियन बिझनेस असोसिएशन’च्या विरोधात न्यू जर्सी शहर परिषदेकडे तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. तसेच ‘या प्रकरणी ‘इंडियन बिझनेस असोसिएशन’ने क्षमा मागावी’, अशी मागणी करण्यात आली आहे.

१. ‘इंंडियन बिझनेस असोसिएश’नचे अध्यक्ष चंद्रकांत पटेल यांनी ‘संघटना क्षमा मागणार नाही; कारण आम्ही काहीही चुकीचे केले नाही. ही पूर्वग्रहदूषित तक्रार आहे’, असे सांगितले. ‘बुलझोडर केवळ सरकारी जमिनीवरील अवैध बांधकामे पाडण्याचे प्रतिनिधित्व करतो’, असे पटेल यांनी सांगितले. या बुलडोझरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फलक लावण्यात आले होते.

२. उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सत्तेत आल्यानंतर दंगलखोर आणि लव्ह जिहाद करणार्‍या मुसलमानांची अवैध बांधकामे बुलडोझरचा वापर करून पाडण्यात आली. दंगली आणि लव्ह जिहाद रोखण्यासाठी धडक मोहीम राबवणारेे योगी आदित्यनाथ यांना ‘बाबा बुलडोझर’ म्हटले जाते.

३. ‘इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिल, ‘कौन्सिल फॉर अमेरिकन इस्लामिक रिलेशन्स’ आणि ‘हिंदू फॉर ह्युमन राइट्स’ यांसारख्या संघटनांनी ‘इंंडियन बिझनेस असोसिएशन’च्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. (भारतात धर्मांध कारवाया रोखण्यासाठी ‘बुलडोझर’ हे प्रतीकात्मक म्हणून वापरले जाते. त्यामुळेच अमेरिकेतील धर्मांध संघटना आणि मानवाधिकार संघटना यांना पोटशूळ उठला आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक)