हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ (वय ५५ वर्षे) सद्गुरुपदी विराजमान होणार असल्याविषयी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. दीपक गोडसे यांना मिळालेल्या पूर्वसूचना !

१. पू. नीलेश सिंगबाळ यांना पाहून प्रसन्न वाटणे आणि ‘त्यांच्यातील चैतन्य पुष्कळ प्रमाणात वाढले असून ते सद्गुरुपदी विराजमान होणार आहेत’, असे जाणवणे

श्री. दीपक गोडसे

‘१२ ते १८.६.२०२२ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील विद्याधिराज सभागृहात ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. त्या निमित्ताने मी तिथे सेवा करत होतो. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मला हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ दिसले. तेव्हा त्यांना पाहून मला पुष्कळ प्रसन्न वाटत होते. ‘त्यांच्यातील चैतन्य पुष्कळ प्रमाणात वाढले आहे’, असे मला जाणवत होते. तेव्हाच माझ्या मनात विचार आला, ‘पू. दादा सद्गुरुपदी विराजमान होणार आहेत.’ ते दिसल्यावर ‘पू. दादा सद्गुरु आहेत’, असे मला वाटायचे.

२. भावसोहळा ‘ऑनलाईन’ पहात असतांना पू. नीलेश सिंगबाळ व्यासपिठावर आल्यावर ‘ते सद्गुरुपदी आरूढ होणार’, असा विचार देवाने देणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे तो क्षण अनुभवता येणे

२९.६.२०२२ या दिवशी रामनाथी येथे होत असलेला भावसोहळा (सद्गुरु सन्मान सोहळा) मला ‘ऑनलाईन’ पहाण्याची संधी मिळाली. पू. नीलेशदादा वाराणसी आश्रमाविषयी सांगण्यासाठी व्यासपिठावर आले. त्या वेळीही ‘पू. नीलेशदादा सद्गुरुपदी आरूढ होणार’, असा विचार देवाने दिला आणि प्रत्यक्षात तो क्षण अनुभवण्याची संधी मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मिळाली.

३. ‘भावसोहळ्याच्या वेळी ‘सद्गुरु नीलेशदादा स्थिर, विनम्र आणि आनंदी आहेत’, असे मला जाणवले.

परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला ही अनुभूती आली. त्याबद्दल त्यांच्या आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. दीपक रमेश गोडसे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.६.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक