‘रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणे, पुरेशी झोप घेणे, मल-मूत्रांची प्रवृत्ती रोखून न धरणे, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात जेवणे अन् नियमित व्यायाम करणे’, ही आरोग्यासंबंधीची मूलभूत पथ्ये आहेत. प्रतिदिन यांचे नेमाने आचरण केले, तर आरोग्य एवढे चांगले रहाते की, जेवणाखाण्याच्या पथ्यांची, म्हणजे ‘पोळीऐवजी भाकरी हवी, भाताऐवजी पोळीच हवी, वाटाणा नको, वांगे नको, बटाटा नको…’, अशा पथ्यांची आवश्यकताच रहात नाही. येथे दिलेल्या मूलभूत पथ्यांविषयीची सविस्तर माहिती सनातनचा ग्रंथ ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !’ यात दिली आहे. या मूलभूत पथ्यांचे आचरण करून निरोगी रहा आणि अनावश्यक पथ्ये टाळा !’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.८.२०२२)