‘हलाल जिहाद’चा विषय लोकसभेमध्ये निश्‍चितपणे मांडीन ! – राहुल शेवाळे, खासदार, शिवसेना

डावीकडून खासदार श्री. धैर्यशील माने आणि शिवसेनेचे खासदार श्री. श्रीरंग बारणे यांना ‘हलाल जिहाद’ ग्रंथ भेट देतांना श्री. सुनील घनवट आणि खासदार श्री. राहुल शेवाळे

मुंबई, २५ ऑगस्ट (वार्ता.) – ‘हलाल जिहाद’ हा विषय मला ठाऊक आहे. लोकसभेमध्ये हा विषय मी निश्‍चितपणे मांडीन, असे आश्‍वासन शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते आणि खासदार श्री. राहुल शेवाळे यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी श्री. राहुल शेवाळे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना समितीचा ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ भेट दिला. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी श्री. सुनील घनवट यांनी पुणे येथील शिवसेनेचे खासदार श्री. श्रीरंग बारणे आणि कोल्हापूर येथील शिवसेनेचे खासदार श्री. धैर्यशील माने यांनाही हा ग्रंथ भेट देऊन हलाल जिहादविषयी सविस्तर माहिती दिली.