(म्हणे) ‘श्रीरामाच्या नावाने देशात आतंकवाद !’ – तुषार गांधी यांचे फुकाचे बोल

श्री. तुषार गांधी

कोल्हापूर – श्रीरामाचे नाव घेऊन देशात आतंकवाद पसरवला जात आहे, लोकांच्या हत्या केल्या जात आहेत. हिंदु राज्य आले पाहिजे, अशी केंद्र सरकारची रणनीती असून त्यांच्या सर्व हालचाली देहली आणि नागपूर येथून चालतात, अशी टीका मोहनदास गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केली. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. (देशात जिहाद्यांकडून हिंदुत्वनिष्ठांच्या वेचून हत्या केल्या जात आहेत. हिंदूंच्या मिरवणुकांवर धर्मांधांकडून दगडफेक आणि आक्रमणे केली जात आहेत. दिवसभरात पाच वेळा वाजणार्‍या भोंग्यांवर कुठेही कारवाई केली जात नाही. या संदर्भात तुषार गांधी यांच्यासारखे नेहमीच मूग मिळून गप्प बसतात आणि ‘श्रीरामाच्या नावाने आतंकवाद पसरवला’ अशी आवई उठवतात. रामराज्य हे भारतातच नव्हे, तर जगात आदर्श होते. त्यामुळे श्रीरामाचा आतंकवादाशी संदर्भ जोडून तुषार गांधी यांनी स्वत:ची वैचारिक दिवाळखोरीच जाहीर केली आहे. – संपादक)

या प्रसंगी तुषार गांधी म्हणाले की,

१. देशात अस्वस्थता पसरली असून वर्ष १९४२ मध्ये सामान्यांच्या मुक्तीसाठी जसा लढा उभारला होता, तसाच लढा पुन्हा उभारून जनक्रांती आणण्याची आवश्यकता आहे.

२. देशात एकच सरकार असल्यामुळे विद्रूपीकरण होत असून देश हुकूमशाहीच्या दिशेने चालला आहे. याला कुठेतरी थांबवणे आवश्यक आहे. (भारतात हुकूमशाही असती, तर तुषार गांधी यांना असे वक्तव्य करता आले असते का ? अशांना पाकिस्तान, तसेच इस्लामिक देशांमध्ये पाठवायला हवे ! – संपादक)