(‘सर तन से जुदा’ म्हणजे शीर धडापासून वेगळे करणे)
१. ‘सर तन से जुदा’सारखी मानसिकता वेळीच चिरडून टाकण्यासाठी उदयपूरच्या (राजस्थान) प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
मुसलमानांमध्ये हिंदूंविषयी कशा प्रकारे द्वेषपूर्ण धर्मांधता वाढत आहे, हे राजस्थानच्या उदयपूरमध्ये कन्हैयालाल या टेलरच्या (शिंपीच्या) हत्येवरून सिद्ध होते. मारेकर्यांनी सामाजिक माध्यमांवर या घटनेची चित्रफीतही प्रसारित केली. यावरून त्यांचे धैर्य किती उंचावलेले होते, हे लक्षात येते. ही घटना घडण्यापूर्वी कन्हैयालालच्या जिवाला धोका असल्याची तक्रार त्याने पोलिसांकडे प्रविष्ट केली होती; परंतु राजस्थान पोलिसांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यांनी कन्हैयालाल याला केवळ सावध रहाण्याची सूचना देऊन दायित्व झटकण्याचे काम केले. भारतात अल्पसंख्यांक असूनही मुसलमानांच्या हितासाठी विविध कायदे करण्यात येत असतांनाच अशा घटना घडत आहेत, हे दुर्दैवी आहे. मारेकरी हे कन्हैयालालकडे कपडे शिवण्याच्या बहाण्याने आले होते. अशा प्रकारची निर्घृणता सीरिया आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये पहायला मिळाली आहे. असे कृत्य धार्मिक उन्माद चढलेले क्रूर गुन्हेगारच करू शकतात. या निर्घृण हत्येविषयी माहिती मिळाल्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री केवळ शांतीचे आवाहन करून विमानाने त्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी निघून गेले. या प्रकरणात राजस्थान सरकार समवेत केंद्र सरकारनेही त्यांची सक्रीयता दाखवणे आवश्यक आहे. सहनशक्ती आणि दुर्लक्ष करण्याचीही एक सीमा असते. आता त्यांचा जिहादी उद्देश चिरडून टाकणे आवश्यक झाले आहे. या आरोपींना इतकी कठोर शिक्षा मिळावी की, ‘सर तन से जुदा’सारख्या मानसिकतेच्या लोकांसाठी एक उदाहरण प्रस्थापित होईल.
२. हिंदूंमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी धर्मांधांनी हिंदूंच्या मिरवणुकांवर दगडफेक आणि त्यांचे शिरच्छेद यांसारखी कृत्ये करणे
राजस्थानमध्ये परत परत उन्माद वाढवणार्या घटना का घडत आहेत ? या राज्यात कायद्याची भीती उरलेली नाही. तेथे कायदे तोडणे, ही अभिमानाची गोष्ट झाली आहे. भारतासाठी अशी मतांध-धर्मांधतेची घटना साधी समजून दुर्लक्ष करणे, ही फार मोठी चूक ठरू शकते. त्याच्यावर वेळेतच कठोरपणे उपाययोजना होणे आवश्यक आहे. खरे पहाता हिंदूंच्या मिरवणुकांवर दगडफेक करणे, मशिदींमधून निघालेल्या जमावाकडून तोडफोड करण्यात येणे, लव्ह जिहाद, ‘सर तन से जुदा’ या जिहादी मानसिकतेतून घडणार्या अशा अनेक घटना या हिंदूंमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. उदयपूरमध्ये कन्हैयालालची हत्या केली जाणे, हा याच अभियानाचा एक भाग आहे.
३. उदयपूरच्या घटनेतील दोन्ही आरोपींचा पाकिस्तानमधील आतंकवादी संघटनांशी संबंध असणे
उदयपूरमधील घटनेच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) गौस महंमद आणि रियाज यांच्या विरोधात हत्या अन् दहशत पसरवणे या आरोपांखाली ‘एफ्.आय.आर्.’ नोंदवला आहे, तसेच हे प्रकरण ‘यूएपीए’ (बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा) कायद्याच्या अंतर्गतही नोंदवले आहे. या घटनेचे अन्वेषण करतांना लक्षात आले की, दोन्ही आरोपींनी पाकिस्तानच्या कराचीमधील एका मौलानाकडून प्रशिक्षण घेतले होते. त्यांचे तेथील काही संपर्क क्रमांकांवर सतत संभाषण होत होते. आरोपींनी कराचीमध्ये वर्ष २०१४-२०१५ या काळात अनुमाने १५ दिवस प्रशिक्षण घेतले आहे. हे दोन्ही आरोपी ‘दावत-ए-इस्लामी’ या संघटनेशी संबंधित आहेत. या संघटनेचा विस्तार १०० हून अधिक देशांमध्ये विखुरलेला आहे. भारतात ही संघटना गेल्या ४ वर्षांपासून सक्रीय आहे. अन्वेषण यंत्रणांच्या म्हणण्यानुसार या आरोपींनी आतंकवादी संघटना ‘इसिस’च्या ध्वनीचित्रफिती पाहिल्या होत्या. त्यांच्या समवेत अन्य लोकांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींच्या केलेल्या प्राथमिक चौकशीत त्यांचा पाकिस्तानातील आतंकवादी गटाशी संबंध असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानच्या एका आतंकवादी संघटनेशी संबंधित व्यक्तीच्या आमंत्रणावरून हे दोघेही नेपाळमार्गे कराचीला पोचले होते. कराचीहून परतल्यानंतर उदयपूरच्या स्थानिक युवकांमध्ये यांची सक्रीयता वाढली होती.
ही घटना घडण्यापूर्वी ३० मार्च या दिवशी राजस्थानच्या चितोडगडच्या निंबाहेडामध्ये १२.२ किलो स्फोटकांसह ‘अल्सफा’ या आतंकवादी संघटनेच्या ३ लोकांना अटक करण्यात आली होती. राजस्थानमध्ये स्फोट करण्याचा त्यांचा हेतू होता. त्यांचा एक सहकारी उज्जैनमध्ये लपला होता. त्याला शोधण्यासाठी आतंकवादविरोधी पथकाचे एक पथक तिकडे गेले होते.
४. भारतातील धर्मांधता थोपवण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक !
नूपुर शर्मा प्रकरणानंतर शिरच्छेद आणि जिव्हाच्छेद (जीभ छाटणे) अशांसारखे फतवे निघणे, हे भारतीय कायद्यांच्या विरोधात आहेत. भारतियांना भुलवण्यासाठी ‘इस्लाम त्यांच्या अनुयायांना प्रामाणिक, इमानदार, दयाळू बनणे आणि मानवता यांचे शिक्षण देते’, असे सांगितले जाते. मग हे लोक कोण आहेत की, जे स्वत:ला इस्लामचे अनुयायी म्हणवतात आणि दिवसाढवळ्या हत्या घडवून आणत आहेत ? शेवटी ही धर्मांधता कुठून जन्माला येते ? याचा इस्लामच्या अनुयायांनी विचार केला पाहिजे. केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी म्हटले आहे, ‘‘देशात जर इस्लामिक धर्मांधतेला थोपवायचे असेल, तर मदरशातील शिक्षण बंद केले पाहिजे.’’ उदयपूर घटनेच्या संदर्भात आरिफ खान यांचे मत योग्य दिशेने संकेत देत असल्याचे दिसून येते.’
– डॉ. किसन कछवाहा
(साभार : पाक्षिक ‘हिंदु विश्व’ (१ ते १५ ऑगस्ट २०२२))
संपादकीय भूमिकामदरशांमधून शिकवली जाणारी धर्मांधता आणि जिहादी मानसिकता रोखण्यासाठी सरकार त्यांच्यावर बंदी कधी आणणार ? |