आरतीच्या वेळी झालेल्या गर्दीमुळे दोघांचा गुदमरून मृत्यू

श्रीकृष्णजन्माष्टमीच्या रात्री मथुरेतील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरातील घटना

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथे १९ ऑगस्टच्या रात्री येथील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने दर्शनासाठी आलेल्या भाविकांपैकी दोघांचा गर्दीमुळे गुदमरून मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गर्दी इतकी होती की, मंगला आरतीच्या वेळी गुदमरून ५० हून अधिक लोक बेशुद्ध पडले. ‘गर्दी वाढल्याने ही घटना घडली’, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अभिषेक यादव यांनी सांगितले. नोएडा येथील रहिवासी निर्मला देवी आणि जबलपूरचे रहिवासी ६५ वर्षीय रामप्रसाद विश्‍वकर्मा यांचा यात मृत्यू झाला. बेशुद्ध पडलेल्या भाविकांना पोलिसांनी जवळच्या रुग्णालयात भरती केले. जवळपास ६ जणांवर उपचार चालू आहेत.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या मंदिरांमध्ये सुनियोजन नसल्यामुळे अशा अनेक घटना घडतात आणि त्यात भाविकांचा नाहक जीव जातो. ही स्थिती पालटण्यासाठी मंदिरे खर्‍या भक्तांच्याच हातात असायला हवी !