देशातील ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांमध्ये महिला एकाहून अधिक पुरुषांशी ठेवतात लैंगिक संबंध !

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सर्वेक्षण

नवी देहली – केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण’ करण्यात आले. यात ‘११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांतील पुरुषांच्या तुलनेत ०.५ टक्के महिला एकाहून अधिक जणांशी लैंगिक संबंध ठेवतात’, अशी माहिती समोर आली आहे. तसेच ४ टक्के पुरुष अशा महिलांशी लैंगिक संबंध ठेवातात, जी त्यांची पत्नी नाही; परंतु एकत्र रहातात. १ लाख १० सहस्र महिला आणि १ लाख पुरुष यांच्यामध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण जम्मू-काश्मीर, लडाख, हरियाणा, चंडीगड, आसाम, राजस्थान, मध्यप्रदेश, केरल, लक्षद्वीप, पुद्दुचेरी आणि तमिळनाडू या राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात आले.

१. राजस्थानमध्ये अशा महिलांची संख्या सर्वाधिक आहे, ज्यांचे एकापेक्षा अधिक पुरुषांशी संबंध आहेत. ही टक्केवारी ३.१ इतकी आहे, तर पुरुषांची संख्या १.८ टक्के इतकी आहे.

२. शहरांतील महिलांपेक्षा ग्रामीण भागांतील महिलांची टक्केवारी यात अधिक दिसून आली. शहरातील महिलांची १.५, तर ग्रामीण भागांतील महिलांची १.८ इतकी टक्केवारी आहे.

३. विविध राज्यांतील महिलांच्या टक्केवारीनुसार उत्तरप्रदेशात २.२, हरियाणात १.८, देहलीत १.१,आसाममध्ये २.१, मध्यप्रदेशात २.५ आणि तमिळनाडूमध्ये २.४ इतक्या प्रमाणात महिला एकाहून अधिक पुरुषांशी संबंध ठेवतात.

संपादकीय भूमिका 

धर्माचरणाच्या अभावी भारताची पाश्‍चात्यांप्रमाणे होत असलेले जलद  नैतिक अधःपतन !