आयुर्वेदातील प्राथमिक उपचार
पुढील दोन्ही उपचार न्यूनतम ३ मास करावेत.
१. चार चमचे ब्राह्मी चूर्ण ४ वाट्या खोबरेल तेलात साधारण १ मिनिट उकळावे. हे तेल गाळून थंड झाल्यावर बाटलीत भरून त्यात १० ग्रॅम भीमसेनी कापूर बारीक करून घालावा आणि बाटलीचे झाकण लावून ठेवावे. प्रतिदिन रात्री झोपतांना यातील १ – २ चमचे तेल डोक्याला लावून झोपावे.
२. रात्री झोपतांना १ चमचा ब्राह्मी चूर्ण अर्धी वाटी कोमट पाण्यात मिसळून प्यावे.
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.८.२०२२)
१. प्रमाणासाठी चहाचा चमचा वापरावा.
२. येथे प्राथमिक उपचार दिले आहेत. ७ दिवसांत गुण न आल्यास वैद्यांचा समादेश (सल्ला) घ्यावा.
३. सनातनचे ब्राह्मी चूर्ण आणि भीमसेनी कापूर उपलब्ध आहेत.