कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालय येथे श्री गणेशचतुर्थी साजरी करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आवाहन

मुसलमान संघटनांकडून विरोध

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकचे शालेय शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी ‘राज्यातील शाळा आणि महाविद्यालये येथे ३१ ऑगस्ट या दिवशी श्री गणेशचतुर्थी साजरी करण्यात यावी’, असे आवाहन केले आहे. यावर मुसलमान संघटनांकडून टीका केली जात आहे. ‘मुसलमान विद्यार्थिनींना शाळा आणि महाविद्यालये यांच्या आवारात हिजाब (मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) परिधान करण्यास बंदी घातली जाते; मग श्री गणेशचतुर्थी साजरी करण्यास अनुमती का दिली जाते ?’, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची विद्यार्थी संघटना ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’चे सदस्य सईद मुईन यांनी म्हटले आहे की, शिक्षणमंत्र्यांनी सरकारी शाळा आणि महाविद्यालये येथे गणेशमूर्ती स्थापित करण्यास अनुमती देणे म्हणजे शिक्षण क्षेत्रात अशांतता निर्माण करून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न आहे. हे निर्षधार्ह आणि लज्जास्पद आहे. गंमत म्हणजे हे तेच मंत्री आहेत, ज्यांनी ‘शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक प्रथांना अनुमती देता येणार नाही’, असे वक्तव्य याआधी केले होते. त्यामुळे इतर धार्मिक समाजातील विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत का ?

संपादकीय भूमिका

असा विरोध कायमचा थांबवण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यास पर्याय नाही !