प्रतिदिन न्यूनतम अर्धा घंटा व्यायाम करा !

वैद्य मेघराज पराडकर

‘आयुर्वेदामध्ये वात, पित्त आणि कफ यांना ‘दोष’ असे म्हटले आहे. वात, पित्त आणि कफ या दोषांच्या कार्यात बिघाड होणे, म्हणजे रोग ! आयुर्वेदानुसार योग्य वेळी जेवणे, पचेल तेच खाणे, शरिरासाठी अहितकर पदार्थ टाळणे इत्यादी आहाराचे नियम पाळल्याने वातादी दोषांच्या कार्यामध्ये संतुलन राहून आरोग्य लाभते; परंतु बर्‍याच वेळेला जेवणासंबंधीचे नियम पाळणे शक्य होत नाही. अशा वेळी शरीर निरोगी ठेवण्याचा सर्वाेत्तम मार्ग म्हणजे ‘व्यायाम करणे’. आहाराचे नियम न पाळल्याने वातादी दोष असंतुलित झाले, तरी नियमित व्यायाम केल्याने ते पुन्हा संतुलित होण्यास साहाय्य होते. त्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रतिदिन न्यूनतम अर्धा घंटा व्यायाम करा !’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.८.२०२२)