सी.एन्.जी. आणि पी.एन्.जी. यांचे दर अल्प !

मुंबई – ‘महानगर गॅस लिमिटेड’ने १७ ऑगस्टपासून मुंबई आणि उपनगर येथील सी.एन्.जी. आणि पी.एन्.जी. यांचे दर अल्प केले आहेत. सी.एन्.जी.ची किंमत प्रतिकिलो ६ रुपये आणि पी.एन्.जी.ची किंमत प्रतियुनिट ४ रुपयांनी अल्प केली आहे. त्यामुळे सी.एन्.जी.ची सर्व करांसह सुधारित किंमत ८० रुपये प्रतिकिलो आणि पी.एन्.जी. गॅसची किंमत ४८.५० रुपये प्रतियुनिट झाली आहे. या निर्णयाद्वारे सी.एन्.जी. गाड्या वापरणार्‍या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.