हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी  वैध मार्गाने आंदोलन  करावे लागेल ! – अधिवक्ता सुनील सिंह, संस्थापक, राम सेना

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे राम सेने’च्या कार्यकर्ता संमेलनामध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

वाराणसी – आपल्याला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी एका हातात बासरी, तर दुसरीकडे वैध मार्गाने आंदोलन करावे लागेल. जेथे ज्याची आवश्यकता आहे, तेथे त्याचा वापर केला, तरच आपण धर्मासाठी लढू शकतो, असे प्रतिपादन ‘राम सेने’चे संस्थापक अधिवक्ता सुनील सिंह यांनी केले. राम सेनेच्या वतीने २६ जुलै या दिवशी कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाला हिंदु जनजागृती समितीचे वाराणसी समन्वयक श्री. राजन केसरी आणि श्री. प्रेमप्रकाश सिंह उपस्थित होते.

या वेळी उपस्थितांना संबोधित करतांना श्री. राजन केसरी म्हणाले, ‘‘धर्माचे आचरण केल्याने आपल्याला ईश्वरी बळ मिळेल. भारत देश विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. या सर्व समस्यांवर हिंदु राष्ट्राची स्थापना हाच उपाय आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राची मागणी जेवढ्या जलदपणे करू, तेवढ्या जलदपणे आपले ध्येय साकार होईल.’’