लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांत चोरी करणारा धर्मांध अटकेत

कल्याण रेल्वे स्थानकावरील १३ चोर्‍या उघड !

ठाणे, १३ ऑगस्ट (वार्ता.) – लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करून महिलांच्या पैशांच्या पिशव्या हातोहात लांबवणार्‍या शहाजाद सय्यद या सराईत चोरट्याला कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याने देशाच्या विविध भागांत लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करून महिलांच्या पैशांच्या पिशव्या चोरल्याचे पोलिसांनी केलेल्या अन्वेषणातून उघड झाले आहे. शहाजाद हा मूळचा अजमेरचा रहिवासी आहे. कल्याण ते मुंबई परिसरात लोकल, लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या, रेल्वे स्थानकांवर चोर्‍या केल्यानंतर लपून रहाण्यासाठी त्याने कल्याणमधील पत्रीपुलाजवळील एका चाळीत भाड्याने खोली घेतली होती. शहाजादकडून पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकात केलेल्या एकूण १३ चोर्‍या उघड केल्या आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • अल्पसंख्यांक गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक !