शिक्षण तुम्हाला हिंदु धर्मावर टीका करायला शिकवते का ?

  • अभिनेत्री रत्ना नसरूद्दीन पाठक-शाह यांनी ‘करवा चौथ’ व्रताला ‘अंधश्रद्धा’ म्हटल्याचे प्रकरण

  • ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांच्याकडून रत्ना पाठक-शाह यांची कानउघाडणी

रत्ना नसरूद्दीन पाठक-शाह आणि मुकेश खन्ना

मुंबई – तुम्ही कोणत्या प्रकारचे शिक्षण घेतले आहे ? हिंदु धर्मात जे काही चालले आहे, ते अंधश्रद्धा आहे आणि अन्य धर्मांत जे काही चालले आहे, ते अंधश्रद्धा नाही, असे कोणत्या पुस्तकात लिहिले आहे. सुशिक्षित लोक स्वतःला इतके सुशिक्षित समजतात की, ते देश आणि धर्म यांच्या विरोधात काहीही बोलतात. तुम्ही मूर्ख आहात. शिक्षण तुम्हाला हिंदु धर्मावर टीका करायला शिकवते का ? असा प्रश्न ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी अभिनेत्री रत्ना नसरूद्दीन पाठक-शाह यांना विचारला.

नुकतीच अभिनेत्री रत्ना यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पतीच्या दीर्घायुष्यासाठी हिंदु धर्मात केल्या जाणार्‍या ‘करवा चौथ’ या व्रताला ‘अंधश्रद्धा’ संबोधून त्यावर टीका केली होती. त्यावर मुकेश खन्ना यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

मुकेश खन्ना पुढे म्हणाले, ‘‘रत्ना पाठक-शाह यांनी स्वत:च्या नावातील ‘पाठक’ या आडनावाला अजूनही जिवंत ठेवले आहे. असे असूनही त्या बालीश वक्तव्ये करत आहेत. तुम्हाला काय वाटते की, तुम्ही शिकलेले आहात ? सुशिक्षित आणि गावातील स्त्रियांसह मोठ्या घरांतील स्त्रियाही ‘करवा चौथ’चा उपवास करण्याविषयी अभिमान बाळगतात. या सुंदर उत्सवाला तुम्ही ‘अंधश्रद्धा’ म्हणता. पत्नी स्वत:च्या पतीच्या सुखासाठी आणि दीर्घायुष्यासाठी एक दिवसाचा उपवास करत असेल आणि चंद्र पाहून व्रत पूर्ण करत असेल, तर यापेक्षा सुंदर काय असू शकते ? ‘जो धर्म तुम्ही विवाहाच्या वेळी अंगीकारला आहे, तो धर्म आता तुमच्यावर अधिकार गाजवतोय’, असे मी मानू का ? असे असेल, तर तुम्ही स्वत:च्या नावापुढे ‘पाठक’ का लिहिता ? ते आडनाव काढून टाका.’’