बांगलादेशात पेट्रोल ५१ टक्के, तर डिझेल ४२ टक्क्यांनी महाग

नागरिकांना श्रीलंकेसारखी स्थिती होण्याची भीती !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशमध्ये पेट्रोलच्या दरात इतिहासातील आजवरच्या सर्वाधिक दराची नोंद झाली आहे. बांगलादेशने पेट्रोलचे दर ५१ टक्क्यांनी वाढवले आहेत, तर डिझेलच्या किमतीत ४२ टक्के वाढ झाली आहे. एका अहवालानुसार वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजवरची झालेली ही सर्वांत मोठी वाढ आहे. पेट्रोलच्या दरात वाढ झाल्याने पेट्रोल पंपांबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ढाक्याच्या आजूबाजूच्या भागातील अनेक पेट्रोल पंपांनी त्यांचे काम बंद केल्याचेही वृत्त आहे.

या प्रचंड वाढीमुळे नागरिकांना ‘आता श्रीलंकेसारखी परिस्थिती ओढावेल’, अशी भीती वाटू लागली आहे. अनेक ठिकाणी आंदोलने चालू झाली आहेत. त्याविरोधात पोलिसांना कारवाई करावी लागली आहे. काही ठिकाणी हिंसक निदर्शने झाल्याचेही वृत्त आहे.