बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानचा राष्ट्रीय ध्वज विकणार्‍या दुकानात ग्रेनेडद्वारे आक्रमण : एकाचा मृत्यू  

पाकिस्तानचा राष्ट्रीय ध्वज

क्वेटा (पाकिस्तान) – पाकच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये पाकिस्तानी राष्ट्रीय ध्वज विकणार्‍या एका दुकानात ग्रेनेड फेकण्यात आले. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर १४ जण घायाळ झाले. आतापर्यंत कुणीही या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले नसले, तरी यामागे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या संघटना असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.