भोपाळमध्ये शिवमंदिरातील शिवलिंगाची तोडफोड !

शिवपिंडीची तोडफोड
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील छोला रस्ता भागात असलेल्या शिवमंदिरातील शिवपिंडीची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडल्याने येथे तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या चित्रीकरणाच्या साहाय्याने आरोपीची ओळख पटवली असून ‘त्याला लवकरच अटक करण्यात येईल’, असे त्यांनी सांगितले आहे. या घटनेनंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी येथे ‘रस्ता बंद’ आंदोलन केले होते.

संपादकीय भूमिका

मध्यप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !