रक्षाबंधनाच्या दिवशी न्यायालयाला सुटी देण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षांकडून सरन्यायाधिशांना विनंती

सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – सर्वाेच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष ज्येष्ठ अधिवक्ता विकास सिंह यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी सुटी नसल्याच्या प्रकरणी सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपिठाकडे विनंती करणारे सूत्र मांडले आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या वेळापत्रकानुसार रक्षाबंधनाची सुटी नाही.

अधिवक्ता विकास सिंह यांनी सूचना केली आहे की, ‘११ ऑगस्ट या रक्षाबंधनाच्या दिवशी सुटी देऊन १३ ऑगस्ट या दिवशी न्यायालय चालू ठेवता येऊ शकते.’ यावर ‘सहकारी न्यायाधिशांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल’, असे सरन्यायाधिशांनी म्हटले आहे.