बांगलादेशात दुर्गापूजेच्या काळात शालांत परीक्षेचे नियोजन !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशच्या शिक्षण मंत्रालयाने शालांत परीक्षेचे वेळापत्रक घोषित केले आहे. यात दुर्गापूजेच्या वेळी परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. ही सरकारची धर्मांध वृत्ती आहे. हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणून सरकार इतरांसमोर धर्मनिरपेक्ष असल्याचे भासवत आहे, अशी टीका ‘हिंदु संगबाद’ या बांगलादेशातील हिंदूंच्या संघटनेच्या ट्विटर खात्यावरून करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

एकीकडे भारतातील अनेक सरकारी शाळांमध्ये नमाजासाठी शुक्रवारच्या दिवशी सुटी दिली जाते, तर दुसरीकडे इस्लामी देशांत अल्पसंख्यांक हिंदूंच्या पूजेच्या वेळी परीक्षांचे आयोजन केले जाते, ही स्थिती लक्षात घ्या !