चातुर्मासात सश्रद्ध भाविक व्रतवैकल्ये मनोभावे साजरी करत असतात; परंतु गेल्या काही वर्षांपासून हिंदुद्वेष्टे बुद्धीभेद करणारे संदेश सामाजिक माध्यमांतून प्रसारित करत असतात. सध्या नागपंचमीनिमित्त बुद्धीभेद करणारा संदेश प्रसारित होत आहे. या संदेशात ‘नागपंचमीचा संबंध नाग या सरपटणार्या सापाशी नसून भारतातील ५ नागवंशीय राजांच्या स्मृतीदिनाशी संबंधित आहे’, असे म्हटले आहे. वास्तविक नागपंचमीच्या दिवशी हळद किंवा रक्तचंदन यांद्वारे पाटावर नवनागांच्या आकृत्या काढून त्यांची पूजा केली जाते. असे असतांना वर उल्लेख केल्याप्रमाणे या ठिकाणी ‘त्या’ ५ राजांचा संबंध येतोच कुठून ?
धर्मशिक्षणाच्या अभावामुळे बुद्धीभेद करणार्या असल्या संदेशांना हिंदु बळी पडून धर्माचरणापासून दूर जातात, हेच हिंदुद्वेष्ट्यांना साध्य करायचे असते. त्यामुळे हिंदूंनी यापुढे हिंदुद्वेष्ट्यांच्या बुद्धीभेद करणार्या संदेशांना बळी न पडता पौराणिक आधार आणि पर्यावरणपूरक असलेले सण श्रद्धेने साजरे करून हिंदुद्वेष्ट्यांचे मनसुबे उधळून लावायला हवेत !
– श्री. श्रीकृष्ण नारकर, पाचल, जिल्हा रत्नागिरी.