
‘महाकुंभपर्वात कोट्यवधींच्या संख्येने येणार्या भाविकांशी कसे वागावे ?, याचे प्रशिक्षण पोलिसांनंतर उत्तरप्रदेश परिवहन विभागाच्या कर्मचार्यांनाही देण्यात येत आहे. महाकुंभपर्वासाठी येणार्या भाविकांची यात्रा अविस्मरणीय होण्यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. यासह भाविकांच्या सेवेसाठी असणारे परिवहन विभागातील सर्व चालक आणि वाहक हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असू नयेत, या उद्देशाने सर्व चालक अन् वाहक यांचे ‘पाेलीस व्हेरिफिकेशन’ (पडताळणी) करण्यात आले आहे.’ (८.१.२०२५)