(म्हणे) ‘माझे देशावर प्रेम नाही’, असे काहींना वाटते; पण ते सत्य नाही !’

  • चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तोंडावर अभिनेते आमीर खान यांचे उफाळून आले देशप्रेम !

  • चित्रपटावर बहिष्कार न घालण्याची विनंती

मुंबई – जेव्हा लोक हिंदी चित्रपटसृष्टी आणि ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याविषयी बोलतात, तेव्हा मला पुष्कळ वाईट वाटते. विशेषतः लोक माझ्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याची मागणी करतात; कारण त्यांच्या मते मला भारत देश आवडत नाही. माझे आपल्या देशावर प्रेम नाही; पण हे सत्य नाही. काही लोकांना वाटते की, मी देश आवडत नसलेल्या व्यक्तींपैकी आहे. हे पुष्कळ दुर्दैवी आहे. मी विनंती करतो की, कृपया माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका. माझा चित्रपट पहा, असे विधान हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आमीर खान यांनी केले. ११ ऑगस्ट २०२२ या दिवशी त्यांचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सामाजिक संकेतस्थळांवर ‘बायकॉट लाल सिंह चड्ढा’ हा ‘ट्रेंड’ सध्या चालवला जात आहे. त्या अनुषंगाने त्यांनी वरील विधान केले.

संपादकीय भूमिका

  • ‘भारत देश सुरक्षित नसल्याने मी माझ्या मुलाच्या सुरक्षेसाठी देश सोडण्याचा विचार करत आहे’, असे विधान अभिनेते आमीर खान यांची पूर्वश्रमीची पत्नी आणि चित्रपट निर्माती किरण राव यांनी केले होते. तेव्हा आमीर खान यांना देशप्रेमाचा पुळका का बरे आला नाही ?
  • हिंदुविरोधी आणि देशद्रोही मानसिकता असणार्‍या अशा अभिनेत्यांच्या चित्रपटांवर मोठ्या संख्येने बहिष्कार घालून भारतियांनी स्वतःचे देशप्रेम दाखवून द्यावे !