मुलींच्या गायब होण्यावर नुसते वरवरचे सरकारी प्रयत्न नकोत ! जनतेला साधना शिकवली, तरच मुली गायब होणार नाहीत !

‘मुंबईतून प्रतिवर्षी शेकडो मुली गायब होत आहेत. वर्ष २०१९ मध्ये १ सहस्र ४८२, वर्ष २०२० मध्ये ८७९, तर वर्ष २०२१ मध्ये १ सहस्र १५८ मुली अशा मागील ३ वर्षांत एकूण ३ सहस्र ५१९ मुली गायब झाल्या आहेत. याविषयी विधानसभेच्या लक्षवेधी सूचनेच्या काळात शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी सूत्र उपस्थित केले. या मुलींचा शोध घेण्यासाठी मुंबईमध्ये आणखी ७ सहस्र सीसीटीव्ही कॅमेरे वाढवण्यात येणार आहेत, अशी माहिती तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सभागृहात दिली.’