भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा !

प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांची केंद्र सरकारकडे मागणी

प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना

नवी देहली – प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांनी केंद्र सरकारकडे भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली. त्यांनी ट्वीट करून सांगितले की, हिंदुस्थानात राहून आपल्या देशाला ‘इंडिया’ म्हणणे आता फार झाले. ज्या दिवशी पाकिस्तानची निर्मिती झाली, त्याच दिवशी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करायला हवे होते. या ट्वीटसमवेत खन्ना यांनी एक व्हिडिओही जोडला आहे, ज्यामध्ये जगद्गुरु परमहंसाचार्य हे मुकेश खन्ना यांना, ‘हिंदु राष्ट्रासंदर्भात तुमचे काय विचार आहेत ?’, असे विचारत आहेत. यावर खन्ना सांगत आहेत की, हा विषय मी एका वर्षापूर्वीही मांडला होता. आपला देश एकेकाळी अखंड होता, तो आज का नाही ? या व्हिडिओतही त्यांनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली होती.