बेंगळुरू (कर्नाटक) – येथे मुसलमान व्यक्तीने त्याच्या पत्नीला उद्वाहनातच (लिफ्टमध्ये) तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. तो हुंड्यासाठी पत्नीला त्रास देत होता. पत्नीने माहेरहून अतिरिक्त हुंडा आणण्यास असमर्थता दर्शवल्याने त्याने तलाक दिला. या प्रकरणी पत्नीने पती महंमद अक्रम याच्याविरोधात येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. विवाहाच्या वेळी अक्रम याने ३० लाख रुपयांचा हुंडा घेतला होता. विवाहानंतर तो आणखी १० लाख रुपये वडिलांकडून आणण्याची मागणी पत्नीकडे करत होता.
संपादकीय भूमिकातोंडी तलाक देण्याच्या प्रकरणी केंद्र सरकारने कायदा बनवूनही अशा घटना थांबलेल्या नाहीत. धर्मांधांना कोणत्याही कायद्याचे भय नसल्याने ते त्याचे नेहमीच उल्लंघन करत असतात. त्यांना आता शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |