चीनमधील वुहानच्या मासळी बाजारातूनच कोरोनाचा प्रसार !

‘सायन्स’ या प्रसिद्ध नियतकालिकात प्रकाशित संशोधनांत दावा

नवी देहली – जगात कोरोना महामारीचा प्रसार चीनमधील वुहान शहराच्या  मासळी आणि मांस बाजारांतून झाल्याचा दावा ‘सायन्स’ या नियतकालिकाने पुराव्यांच्या आधारे केला आहे. (यावरून भारताने चीनला जगातील कोट्यवधी लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरवून त्याच्यावर आंततराष्ट्रीय स्तरावर कठोर निर्बंध लादले जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक)

यापूर्वीही अशाच प्रकारचे दावे करण्यात आले आहेत. या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आलेल्या दोन संशोधनांमध्ये हा दावा करण्यात आला आहे.