मादागास्करच्या राजधानीत उभारण्यात आलेल्या भव्य हिंदु मंदिराचे उद्घाटन !  

एंटानानैरिवो (मादागास्कर) – आफ्रिका खंडच्या पूर्वेकडे असलेल्या मादागास्कर देशाची राजधानी एंटानानैरिवो येथे २६ जुलै या दिवशी भव्य हिंदु मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. २ कोटी ६० लाख लोकसंख्या असणार्‍या या देशाच्या राजधानीतील हे पहिले हिंदु मंदिर आहे.

उद्घाटनाच्या वेळी भारताचे राजदूत अभय कुमार उपस्थित होते. मादागास्कर देशात २० सहस्रांहून अधिक भारतीय वंशाचे लोक रहातात. यांतील सर्वाधिक लोक गुजराती आहेत. देशातील अन्य राज्यांतही हिंदूंची काही लहान मंदिरे आहेत.