हाजीपूर (बिहार) येथे साधूंचा वेश परिधान करून भीक मागणार्‍या ५ मुसलमान तरुणांना बजरंग दलाने पकडले !

वैशाली (बिहार) – येथील हाजीपूरमध्ये साधूचा वेश परिधान करून आणि सजवलेला बैल घेऊन भीक मागणार्‍या ५ मुसलमान तरुणांना कह्यात घेण्यात आले आहे. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडले आणि पोलिसांच्या कह्यात दिले. त्यांच्याकडून २ आधार कार्ड आणि ५ भ्रमणभाष संच जप्त करण्यात आले आहेत. हे सर्व जण उत्तरप्रदेशातील रहाणारे आहेत.
बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष आर्यन सिंह म्हणाले की, हे सर्व रोहिंग्या मुसलमान आहेत. ते कुठल्या तरी संघटनेशी संबंधित आहे. हे एक षड्यंत्र आहे.

संपादकीय भूमिका

  • साधूचा वेश परिधान करून भीक मागण्याचा प्रयत्न केला जात आहे की, काही कटकारस्थाने करण्याचा प्रयत्न होत आहे, हे पोलिसांनी सखोल चौकशी करून शोधून काढले पाहिजे ! यासह अशांना आजन्म कारावासात ठेवण्याची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
  • बजरंग दलाला जे लक्षात येते, ते पोलिसांच्या गुप्तचरांना का लक्षात येत नाही ? कि ते निष्क्रीय झाले आहेत ?