कॅथॉलिक चर्चमध्ये लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी पाद्य्रांना ब्रह्मचारी रहाण्याचा नियम पालटण्याची सिद्धता !

आत्मसंयम राखता येत नसल्यानेच चर्चकडून असा निर्णय घेण्यात येत आहे, हे लक्षात घ्या !

व्हॅटिकन सिटी – ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी कॅथॉलिक चर्चच्या पाद्य्रांसाठी असलेली ‘प्रिस्टली सेलिबेसी’ ही प्रथा हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी याविषयीचे सूत्र मांडले आहे. त्यावर जगभरातील १४० कोटी कॅथॉलिक ख्रिस्त्यांकडून मत मागवण्यात आले आहे. पाद्य्रांवर होत असलेल्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांना रोखण्यासाठी पोप यांच्याकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. ही प्रथा हटवण्यात आल्यानंतर पाद्य्रांना ब्रह्मचर्येचे पालन करावे लागणार नाही.

१. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थेच्या आकडेवारीनुसार १ ते ३ टक्के पाद्री मुलांवर अत्याचाराचा विचार करतात. अमेरिका, फ्रान्स, आयर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया यांसह अनेक देशांत पाद्य्रांकडून मुलांचे लैंगिक शोषण करण्यात आले आहे.

२. एकट्या फ्रान्समध्ये वर्ष १९५० ते २०२० पर्यंत २ लाख १६ सहस्र पीडितांवर या काळात पाद्य्रांकडून अत्याचार झाला होता. गरीब देशांतील स्थिती तर आणखी वाईट आहे. या देशांतील अशा बहुतेक गुन्ह्यांची नोंदच होत नाही.

काय आहे ‘प्रिस्टली सेलिबेसी’ प्रथा ?

‘प्रिस्टली सेलिबेसी’ अंतर्गत कॅथॉलिक चर्चमधील पाद्य्राला आजीवन ब्रह्मचारी रहावे लागते. या नियमांमुळे पाद्य्रांची लैंगिक इच्छा पूर्ण होत नाहीत. तसेच ब्रह्मचर्याचे पालन प्रत्येकाला करता येत नाही. त्यामुळे पाद्य्रांच्या संख्येतही घट झाली आहे. पाद्री झाल्यानंतर ब्रह्यचर्याचे योग्य पालन करणार्‍यांची संख्याही अल्प आहे. पाद्री झाल्यावर प्रारंभी संयम पाळला जातो; परंतु नंतर बालकांचे शोषण करण्यात आल्याची अनेक उदाहरणे आहेत. रोमन कॅथॉलिक पाद्य्रांसाठी ११ व्या शतकापूर्वी ब्रह्मचारी असणे बंधनकारक नव्हते; परंतु पुढे पाद्य्रांच्या कुटुंबियांच्या भरणपोषणाचा खर्च चर्चकडून द्यावा लागत होता. त्यामुळे हा नियम लागू करण्यात आला. ‘पाद्य्रांसमवेत कुटुंब असल्यास ते पूर्णपणे पुण्याचे कार्य करू शकणार नाहीत’, अशी तेव्हाची धारणा राहिली.