१. ‘आश्रमात यायला मिळाले’, याबद्दल मला आनंद आणि धन्यता वाटत आहे.’ – श्री. रोहित रवि भट, (राष्ट्रीय उपाध्यक्ष, पनून कश्मीर), पुणे (१४.६.२०२२)
२. ‘आश्रम सात्त्विक, पवित्र आणि दैवी आहे. येथे असतांना ‘मी सकारात्मक ऊर्जेच्या विश्वात आहे’, असे मला वाटले. मला सनातनच्या (राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्या) कार्यात सहभागी व्हायचे आहे.’ – डॉ. वैदेही ताम्हण (प्रमुख संपादिका, ‘आफ्टरनून व्हॉईस’), मुंबई, महाराष्ट्र. (१४.६.२०२२)
३. ‘आश्रमातील वातावरण उत्साहवर्धक आहे. येथील साधक एकमेकांना चांगल्या प्रकारे सहकार्य करतात.’
– रूपल मिस्त्री (१४.६.२०२२)
४. ‘आश्रमात सर्वत्र सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असून येथे शीतलता जाणवते. हिंदु राष्ट्र-स्थापनेविषयी असलेल्या दृढ श्रद्धेला साधकांच्या समर्पणभावाची जोड आहे.’ – श्री. राहुल कौल (राष्ट्रीय समन्वयक, पनून कश्मीर), पुणे
५. ‘सनातन संस्था आणि आश्रम दोन्ही दैवी आहेत. ते हिंदु संस्कृतीचे रक्षण आणि जतन करण्याचे कार्य निःस्वार्थपणे करत आहेत.’ – श्री. अक्षय रेडिज, मुंबई, महाराष्ट्र. (१४.६.२०२२)
६. ‘आश्रमात आल्यावर मला आनंद जाणवला. आश्रम चैतन्यमय आहे. येथील कार्य पाहून ‘आपला ‘सनातन धर्म’ नावाप्रमाणे आदि आणि अंत नसलेला आहे’, असे मला वाटले.’ – श्री. संतोष एस्., बेंगळुरू, कर्नाटक.
(१५.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |