‘काली’सारखे माहितीपट बनवणार्‍यांचा शिरच्छेद करणार्‍यांना २० लाख रुपये देईन !

हरिद्वार येथील श्री पंचायती निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्‍वर स्वामी वैरागानंद गिरी महाराज यांची घोषणा

महामंडलेश्‍वर स्वामी वैरागानंद गिरी महाराज

ग्रेटर नोएडा (उत्तरप्रदेश) – ‘काली’ सारख्या माहितीपटांद्वारे हिंदु धर्माला अपकीर्त करण्याचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे. माता कालीचा अपमान होत आहे. निरंजनी आखाड्याचा संत असल्याने मी घोषित करतो की, असे चित्रपट बनवणार्‍यांचा शिरच्छेद करणार्‍यांना मी २० लाख रुपये देईन, अशी घोषणा हरिद्वार येथील श्री पंचायती निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्‍वर स्वामी वैरागानंद गिरी महाराज (धर्मगुरु मिर्ची बाबा) बाबा यांनी येथे केली. ते सध्या नोएडाच्या दौर्‍यावर आहेत. ‘आश्रम’ या ‘वेब सीरिज’चे (‘अ‍ॅप्स’वरील मालिका) निर्माते हिंदु धर्मावर आघात करत आहेत’, असेही त्यांनी सांगितले.

महामंडलेश्‍वर स्वामी वैरागानंद गिरी महाराज पुढे म्हणाले की, सर्वत्र कायदेशीर कारवाई केली जात आहे. ठिकठिकाणी आवेदने दिली जात आहेत; मात्र कायद्याची पूर्ण कार्यवाही होत नाही. सरकारने या लोकांना पकडून कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे.