जिहाद्यांपासून रक्षण करण्यासाठी विहिंपचा हिंदूंसाठी लवकरच ‘हेल्पलाईन’ क्रमांक  

जिहाद्यांपासून धोका असलेल्या हिंदूंना संपर्क साधून साहाय्य मागता येणार !

नवी देहली – राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैयालाल यांचा जिहाद्यांनी शिरच्छेद केला, तर महाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे यांची जिहाद्यांनी हत्या केली. या पार्श्‍वभूमीवर हिंदूंना लवकरच ‘हेल्पलाईन’ क्रमांक देण्याची घोषणा विश्‍व हिंदु परिषदेने ट्विटरद्वारे केली. देहली, राजस्थान, उत्तरप्रदेश, पंजाब आणि गुजरात या राज्यांमध्ये हे क्रमांक प्रसारित करण्यात येणार आहेत. ‘इतर राज्यांसाठीही ‘हेल्पलाईन’ क्रमांकही लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहेत’, असे विहिंपने म्हटले आहे.

विहिंपचे संयुक्त सरचिटणीस सुरेंद्र जैन म्हणाले, ‘‘कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांच्या हत्येमुळे संपूर्ण जग हादरले आहे. लोकांना सामाजिक माध्यमांवरून धमक्या दिल्या जात आहेत. या धमक्या मिळाल्यास लोकांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट करावी. जर पोलीस कारवाई करत नसतील, तर ‘हेल्पलाईन’द्वारे आमच्याशी संपर्क साधावा.’’