बागलकोटे (कर्नाटक) येथे छेडछाडीवरून हिंदु आणि मुसलमान यांच्यात हिंसाचार : ४ जण घायाळ

बागलकोटे (कर्नाटक) – येथील केरुर टाऊन भागात ६ जुलैच्या सायंकाळी हिंदु आणि मुसलमान यांच्यात मुलीच्या छोडछाडीवरून हिंसाचार झाला. यात ४ जण घायाळ झाले. या हिंसाचाराच्या वेळी जाळपोळ आणि धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला.

घायाळांमध्ये लक्ष्मण कट्टीमनी आणि अरुण कट्टीमनी या दोघा तरुणांचा समावेश आहे. त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी आक्रमण करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. सध्या येथे ८ जुलैपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

याला उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई करून पुन्हा असा हिंसाचार होणार नाही, असा वचक पोलिसांनी निर्माण करावा !