‘अनन्या’ या मराठी चित्रपटाच्या ‘पोस्टर’द्वारे श्री दुर्गादेवीचे विडंबन !

(वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. विडंबन समजण्यासाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक )

पुणे, ६ जुलै (वार्ता.) – ‘एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट’, ‘ड्रीमव्हीवर एंटरटेन्मेंट’ आणि रवि जाधव निर्मित ‘अनन्या’ हा मराठी चित्रपट २२ जुलै या दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात ‘अनन्या’ची व्यक्तिरेखा ऋता दुर्गुळे ही अभिनेत्री साकारत आहे. नुकतेच या चित्रपटाचे प्रदर्शनपूर्व विज्ञापन (ट्रेलर) सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले. यात अनन्याचा प्रवास दिसत आहे. या चित्रपटाच्या ‘पोस्टर’वर श्री दुर्गादेवीच्या रूपामध्ये अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांना दाखवून श्री दुर्गादेवीचे विडंबन करण्यात आले आहे. यामुळे समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. (आज हिंदू संघटित नसल्यामुळेच चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आदी हिंदूंच्या देवतांचे विडंबन करण्याचे धाडस करतात. अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात असे विडंबन करण्याचे धाडस ते कधी दाखवत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • हिंदु धर्माचे खरे वैरी हिंदूच !
  • हिंदूंनो, देवतांचे विडंबन रोखण्यासाठी ते करणार्‍यांना संघटितपणे विरोध करून पुन्हा असे धाडस न करण्यास भाग पाडा !