आगरा येथील जामा मशिदीचे उत्खनन करण्यात यावे ! – प्रयागराज उच्च न्यायालयात याचिका

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – आगरा येथील जामा मशिदीचे पुरातत्व विभागाने  उत्खनन करावे, अशी विनंती करणारी नवी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात अधिवक्ता वरुण कुमार यांनी प्रविष्ट केली आहे. त्यांचे म्हणणे आहे, ‘या मशिदीच्या पायर्‍यांच्या खाली ठाकूर केशव देवजी यांच्या मंदिराचे अवशेष मिळण्याची शक्यता आहे.’ अधिवक्ता वरुण कुमार यांनी यापूर्वी याच प्रकारची याचिका मथुरा न्यायालयातही प्रविष्ट केली होती; मात्र अद्याप त्याची सुनावणी झालेली नाही.

याविषयी जामा मशिदीचे इमामुद्दीन यांनी सांगितले की, ही मशीद शहाजहानची मुलगी जहाँ आरा हिने बांधली होती. तिच्या लग्नाच्या खर्चातून उरलेल्या पैशांतून ही मशीद बांधल होती. या मशिदीच्या पायर्‍यांखाली अवशेष सापडण्याची शक्यता नाही. अशा परिस्थिती संपूर्ण मशिदीत खोदकाम करणारे उचित नाही.

संपादकीय भूमिका 

वास्तविक हिंदूंना अशा याचिका प्रविष्ट कराव्या लागू नयेत. केंद्र सरकारनेच भारतभरातील वादग्रस्त मशिदींचे सर्वेक्षण करून सत्य समोर आणण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !