कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांची हत्या करणाऱ्यांना फाशी द्या !

नाशिक येथील हिंदुत्वनिष्ठांची मागणी

निवेदन देण्यासाठी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

नाशिक – कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांच्या हत्या करणाऱ्यांना फाशी द्यावी, तसेच त्यांना साहाय्य करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी  हिंदुत्वनिष्ठांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या वेळी हिंदु एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रामसिंग बावरी, विश्व हिंदु परिषदेचे श्री. कैलास देशमुख, हिंदु जनजागृती समितीचे श्री. गौरव जमधडे, बजरंग दलाचे श्री. श्रीकांत क्षत्रिय, श्री. योगेश घाटगे, उद्योजक संदीप वाघ, अमोल शिंदे आदी हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.