‘ब्रिक्स प्लस’ परिषदेपासून पाक वंचित : भारतावर खापर फोडले

नवी देहली – ‘ब्रिक्स’ (भारत, ब्राझिल, दक्षिण आफ्रिका, चीन आणि रशिया ) या देशांच्या समुहाची वार्षिक परिषद यंदा चीनने २३ अन् २४ जून या दिवशी आयोजित केली होती. परिषदेच्या दुसर्‍या दिवशी ‘ब्रिक्स’मध्ये सहभागी नसलेल्या देशांसाठी ‘ब्रिक्स प्लस’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पाकिस्तान या परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत होता; परंतु त्याला त्यामध्ये अपयश आल्याने त्याने त्याचे खापर भारतावर फोडले. चीनने मात्र पाकचा हा दावा फेटाळून लावत ‘हा या समुहाचा अंतर्गत प्रश्‍न असून सदस्य देशांनी यावर विचार करून पाकिस्तानला सहभागी होऊ दिले नाही’, असे स्पष्ट केले.

१. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर एक अधिकृत प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करून भारताचे नाव न घेता भारतावर आरोप केले.

२. पाक सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून साहाय्य मिळावे, यासाठी प्रयत्न करत आहे.

३. ‘ब्रिक्स प्लस’ परिषदेत अल्जेरिया, कंबोडिया, इजिप्त, इथिओपिया, फिजी, इंडोनेशिया, इराण, कझाकिस्तान, सेनेगल, उज्बेकिस्तान, मलेशिया आणि थायलँड हे देश सहभागी झाले होते.

संपादकीय भूमिका

उठसूठ भारताला लक्ष्य करणारा पाक ! भारताने आता पाकला त्याला समजेल अशा भाषेत धडा शिकवायला हवा !