कमलेश तिवारी यांच्या पत्नीला ठार मारण्याची धमकी : पोलिसांनी केली सुरक्षेत वाढ !

दिवंगत हिंदु नेते कलमेश तिवारी यांच्या पत्नी किरण तिवारी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील सहारनपूर येथे बजरंग दलाच्या ४ कार्यकर्त्यांना धमक्यांची पत्रे पाठवण्यात आली आहेत. तसेच दिवंगत हिंदु नेते कलमेश तिवारी यांच्या पत्नी किरण तिवारी यांनाही ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तिवारी यांची वर्ष २०१९ मध्ये मुसलमानांनी गोळीबार करण्यासमवेत गळा चिरून हत्या केली होती. त्यांच्या पत्नीला यापूर्वीही ठार मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. यानंतर पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या देशात हिंदू असुरक्षित ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !