कराची (पाकिस्तान) येथे ‘सॅमसंग’ने केलेल्या पैगंबरांच्या कथित अवमानाच्या प्रकरणी मॉलमध्ये तोडफोड

पैगंबर यांच्या कथित अवमानाच्या प्रकरणी येथील ‘स्टार सिटी मॉल’मध्ये मुसलमानांनी केली मोठ्या प्रमाणात तोडफोड

कराची (पाकिस्तान) – ‘सॅमसंग’ आस्थापनाकडून झालेल्या पैगंबर यांच्या कथित अवमानाच्या प्रकरणी येथील ‘स्टार सिटी मॉल’मध्ये मुसलमानांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. पोलिसांनी अवमानाच्या प्रकरणी ‘सॅमसंग’च्या २७ कर्मचार्‍यांना अटक केली आहे.

या प्रकरणी या आस्थापनाने क्षमा मागितली आहे. हिंसाचार करणारे ‘तहरीक ए लब्बैक पाकिस्तान’ या जिहादी संघटनेचे सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘सॅमसंग’ने जारी केलेल्या भ्रमणभाषच्या क्युआर कोडमध्ये पैगंबर यांचा अवमान झाल्याचा दावा मुसलमानांकडून करण्यात आला होता.

संपादकीय भूमिका

मुसलमान कुठेही असले, तरी ते त्यांच्या श्रद्धास्थानांचा कथित अवमान झाला, तरी कायदा हातात घेतात, तर हिंदू त्यांच्या श्रद्धास्थानांचा खरोखर अवमान करण्यात आला, तर वैध मार्गानेही विरोध करत नाहीत !