पाकिस्तानमध्ये आता इंटरनेट सेवा खंडित होण्याची शक्यता !

विजेचे वाढते संकट कारणीभूत

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमध्ये विजेचे संकट आले असतांनाच आता भ्रमणभाष आणि इंटरनेट सेवा खंडित करण्याची चेतावणी दूरसंचार आस्थापनांनी दिली आहे.

याची माहिती ‘नॅशनल बोर्ड ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ने ट्वीट करून दिली आहे. विजेच्या टंचाईमुळे त्यांच्या कार्यात अडथळे निर्माण होत असल्याने त्यांनी ही चेतावणी दिली आहे.

संपादकीय भूमिका

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असणार्‍या पाकचे आता तुकडेच होणार, यात शंका नाही !