बांगलादेशच्या नौदलाकडून १३५ भारतीय मासेमारांना अटक

८ नौका जप्त

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशच्या नौदलाने बांगलादेशच्या सागरी सीमेमध्ये कथितरित्या घुसखोरी केल्याच्या आरोपावरून भारताच्या १३५ मासेमारांना अटक केली. यासह ८ ‘ट्रॉलर्स’ही जप्त करण्यात आले आहेत. नौका आणि त्यावरील मासे यांची एकूण किंमत ३ कोटी ८० लाख रुपये इतकी आहे.

सौजन्य :News7India

संपादकीय भूमिका

कालपर्यंत पाकिस्तान आणि श्रीलंका जे करत होते, ते आता बांगलादेशही करू लागले आहे. हे भारताचा शेजारील देशांवर वचक नसल्याचेच द्योतक आहे !