सोनिया गांधी यांच्या स्वीय साहाय्यकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद

नवी देहली – एका दलित महिलेवर बलात्कार करण्यात आल्याच्या आरोपावरून सोनिया गांधी यांचे ७१ वर्षीय स्वीय साहाय्यक पी.पी. माधवन् यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. माधवन् यांनी विवाह आणि नोकरी देण्याचे आमीष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप या महिलेकडून करण्यात आला आहे.

माधवन् यांच्याकडून ठार मारण्याची धमकी येत असल्याने तिने संरक्षण देण्याचीही मागणी केली आहे. वर्ष २०२० मध्ये या महिलेच्या पतीचे निधन झाले. ते देहलीतील काँग्रेसच्या कार्यालयात कामगार म्हणून काम करत होते. माधवन् यांनी हे आरोप फेटाळून लावत ‘हे आरोप आधारहीन असून एक षड्यंत्र आहे’, असे म्हटले आहे.