नगर येथील ‘अर्बन’ अधिकोषातील अपव्यवहारावर कारवाई नाही ! – अधिकोषाचे सभासद

नगर अर्बन अधिकोष

नगर – जवळपास ११० वर्षांची परंपरा असलेल्या नगर अर्बन अधिकोषात कोट्यवधींचा अपव्यवहार झाला आहे. अधिकोषाची अनुमाने ४६० कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकी वसुलीसाठी संचालक मंडळ, तसेच वरिष्ठ अधिकारीही काहीच प्रयत्न करतांना दिसत नाहीत. उलट कर्जदारांना पाठीशी घालण्याचे काम संचालक करत आहेत. पोलीस यंत्रणा, आर्थिक गुन्हे शाखा, केंद्रीय निबंधक कार्यालय अशा कोणत्याही यंत्रणेकडून कर्ज वितरणात मोठा घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई होतांना दिसत नाही, अशी खंत अधिकोषाचे सभासद राजेंद्र चोपडा यांनी व्यक्त केली आहे. (एवढा मोठा घोटाळा होऊनही या प्रकरणी संबंधित प्रशासकीय यंत्रणा झोपली आहे का ? प्रशासनाचे या घोटाळ्यातील संबंधितांशी लागेबांधे आहेत का ? हेसुद्धा पाहिले पाहिजे. – संपादक) अपव्यवहार करणाऱ्यांना न्यायालयीन मार्गाने शिक्षाही मिळालीच पाहिजे, अशी आग्रही भूमिकाही त्यांनी मांडली आहे.