पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनी आणि संयुक्त अरब अमिरात दौर्‍यावर

जी-७ शिखर परिषदेत घेणार सहभाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जर्मनी आणि संयुक्त अरब अमिराती यांच्या दौर्‍यावर मार्गस्थ झाले. ते जर्मनीमधील आयोजित जी-७ शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेत पंतप्रधान हे पर्यावरण, ऊर्जा, हवामान, अन्न सुरक्षा, आरोग्य, लैंगिक समानता आणि लोकशाही या विषयांवर विचार मांडण्याची शक्यता आहे.

जी-७ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी सहभागी देशांतील काही नेत्यांसमवेत द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत. २८ जून या दिवशी मोदी भारतात परततील.