नवी देहली – गुजरातमध्ये वर्ष २००२ मध्ये झालेल्या दंगलीच्या प्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी प्रविष्ट केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. गेल्या वर्षी ९ डिसेंबर या दिवशी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर २४ जून या दिवशी झाकिया जाफरी यांनी प्रविष्ट केलेल्या याचिका योग्य नसल्याचे सांगत न्यायालयाने ही याचिका फेटाळली. २८ फेब्रुवारी २००२ या दिवशी कर्णावती येथे झालेल्या दंगलीत एहसान जाफरीसह ६९ जणांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. अन्वेषणानंतर विशेष अन्वेषण पथकाने नरेंद्र मोदींसह ६४ जणांना निर्दोेष घोषित केले होते. त्याविरोधात झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.