मस्क यांच्या ट्विटर खरेदीच्या प्रस्तावाला ट्विटर बोर्डची अनुमती

अमेरिकी अब्जाधीश इलॉन मस्क

सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका) – ट्विटरच्या भागधारकांच्या बोर्डाने ‘टेस्ला’ आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अमेरिकी अब्जाधीश इलॉन मस्क यांच्या ट्विटरला ४ सहस्र ४०० कोटी डॉलरला विकत घेण्याच्या प्रस्तावाला एकमताने अनुमती दिली. विलिनीकरणाचा ठराव एकमताने संमत करण्यात आल्याचे ट्विटरच्या संचालक मंडळाने स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात ट्विटरच्या कर्मचार्‍यांसह ऑनलाइन बैठकीत मस्क यांनी आस्थापनाच्या अधिग्रहणावर पुढे जाण्याचा पुनरुच्चार केला होता.

आस्थापनाने ४ एप्रिल २०२२ या दिवशी जेव्हा मस्क यांना त्यांच्या बोर्डवर घेण्याचा प्रस्ताव दिला, तेव्हा ट्विटरला ही किंमत मिळाली होती. ट्विटर भागधारकांना आता प्रति शेअर १५.२२ डॉलरचा (१ सहस्र १९१ रुपयांचा) लाभ होणार आहे.