मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील नगरपालिकेच्या बैठकीत ‘वन्दे मातरम्’ चालू असतांना ४ बुरखाधारी नगरसेविका बसून !

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथील नगरपालिकेच्या बैठकीत मुसलमान नगरसेवकांनी राष्ट्रीय गीताचा अवमान केला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आह. यामध्ये ‘वन्दे मातरम्’ गीत चालू असतांना सर्व नगरसेवक उभे आहेत; परंतु ४ बुरखाधारी महिला नगरसेवक बसून असल्याचे दिसत आहे. या बैठकीत केंद्रीय पशुपालन आणि मत्स्यपालन विभाग मंत्री संजीव बालियान हेही उपस्थित होते. बालियान यांनी या घटनेविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, जर महिलाच राष्ट्रीय गीताचा अवमान करत असतील, तर समाज सशक्त कसा होईल ?

संपादकीय भूमिका

अशांचे नगरसेवकपद रहित करण्याची मागणी अन्य लोकप्रतिनिधी आणि देशप्रेमी नागरिक यांनी सरकारकडे केली पाहिजे !